महत्त्वाच्या बातम्या

कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार साजरा

सातारा:  कारगिल विजय दिवस सातारा येथे  पालकमंत्री  शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सैनिक स्कूल, सातारा ऑडिटोरियम हॉल येथे  २६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता साजरा होणार आहे. या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्ह्यातील, भारतमातेच्या रक्षणार्थ कारगिल युध्दामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता तसेच या युध्दामध्ये दिव्यांगत्व आलेल्या आणि शौर्य पुरस्कारधारक यांचा पालकमंत्री  देसाई यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
तरी  जिल्हयातील सर्व वीरपत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या अवलंबितांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!