महत्त्वाच्या बातम्या

किराणा दुकानातील चोरी प्रकरणाचा तात्काळ छडा लावत आरोपीस केले होते जेरबंद;व्यापारी संघटनेतर्फे दहिवडी पोलीसांचा गौरव 

    दहिवडी  येथील चैतन्य गुंडगे यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्यात आली होती. सदर चोरीची तक्रार दहिवडी पोलीस स्टेशनला करण्यात आली होती.दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि दत्तात्रय दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ सूत्रे हलवत त्या चोरीचा छडा लावत आरोपींना जेरबंद केले.त्याबद्दल दहिवडी व्यापारी संघटनेच्यावतीने दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ व्यापारी शेखर गांधी,कापड दुकान अध्यक्ष राजाभाऊ गुंडगे,सुरेश गुंडगे,किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चैतन्य गुंडगे,किसन सावंत,अमोल सावंत,सिद्धार्थ गुंडगे,सागर गोंजारी, वृषभ गांधी,अमित गांधी,विकास म्हेत्रे,घनवट व इतर व्यापारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!