“किसान सन्मान दिवस २०२४” च्या निमित्ताने किसान व ग्रामीण विकास लाभार्थी संमेलना”चे आयोजन
“किसान सन्मान दिवस २०२४” च्या निमित्ताने भा.कृ.अ.प. कृषि प्रौद्योगिकी अनुप्रयोग अनुसंधान संस्थान पुणे यांच्यावतीने “किसान व ग्रामीण विकास लाभार्थी संमेलना”चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय कृषी आणि ग्राम विकास मंत्रीमाननीय श्री.शिवराजसिंह चौहानजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस, मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील,
उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत भाजपा किसान मोर्चा सरचिणीस, महाराष्ट्र मा.रामकृष्ण वेताळ साहेब उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आधुनिक शेतकऱ्यांच्या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन प्रगतशील महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील घराची चावी देऊन, या प्रसंगी सन्मानित करण्यात आले.
