कुटुंबाचा एकमेव आधार गेल्याने मुले आणि पत्नीवर संकट कोसळले
दहिवडी: माण तालुक्यातील शिरताव ग्रामपंचायतचा कर्मचारी रंजीत शामराव चव्हाण (वय ३९) याचा ड्युटीवर असताना पाणी सोडायला गेल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे परिवाराचा एकमेव आधार गेल्यामुळे मुले आणि पत्नीवर संकट कोसळले आहे. पालकमंत्री शंभूराजे देसाई हे दोन दिवसापूर्वी माण तालुक्यातील म्हसवड येथे अतिवृष्टीने नुकसान झाल्याची पाहणी करण्याकरिता आले होते. नवरात्री असल्यामुळे ते बिना चप्पलचे अनवाणी व उपवास असल्यामुळे रिकाम्या पोटी जनतेच्या आणि व्यापाऱ्यांच्या दुःखात सामील होऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी आले होते. त्यांच्या या आदर्श कामगिरीमुळे संपूर्ण राज्यातून कौतुक केले जात आहे.
परंतु शिरताव ग्रामपंचायतीचा गरीब आणि कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंब उघड्यावर पडले आहे. म्हसवड पासून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या शिरताव गावांमध्ये आले असते आणि कुटुंबाचे सांत्वन केले असते तर खूप बरे झाले असते. अजून एक पुण्य त्यांच्या पदरामध्ये पडले असते. असे नागरिकांमधून मत व्यक्त केले जात आहे.
वडिलांचे छत्र हरपले….मुलांवर संकट
कै. रणजित चव्हाण यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा शंभु हा इयत्ता ९ वी मध्ये शिकतोय आणि मुलगी संतोषी ५ वी शिकतेय आता वडिलांचे छत्र हरपले. या चिमुरड्यांसमोर आता शिक्षणाचा आणि जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय. एकमेव आधार गेलाय आता उरले आहे फक्त दुःख..
