महत्त्वाच्या बातम्या

कृषी सेवेच्या जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) संयुक्त पूर्वपरीक्षेत कृषी सेवेच्या पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कृषी सेवेतील २५८ पदे ही राज्यसेवेच्या परीक्षेत समाविष्ट झाली असून, त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना १७ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे.

 

अर्ज महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेत कृषी सेवेतील २५८ पदांच्या भरती प्रक्रिया

 

राबविण्याची, या पदांचा समावेश संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये करण्याची स्पर्धा परीक्षार्थीची मागणी होती. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंतीही करण्यात आली होती. मात्र, मागणी मान्य होत नसल्याने स्पर्धा परीक्षार्थीनी पुण्यात आंदोलन केले. या आंदोलनामुळे राज्य शासनाने नियोजित संयुक्त

 

पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची विनंती एमपीएससीला केली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या बैठकीत कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश संयुक्त पूर्वपरीक्षेत करण्याचा निर्णय घेण्यात आला. संयुक्त पूर्वपरीक्षा १ डिसेंबर रोजी होणार आहे.

 

ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेला नाही; परंतु ते परीक्षेचे निकष पूर्ण करत आहेत, अशा उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्याने अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांना फक्त महाराष्ट्र कृषी सेवेसाठी अर्ज करता येईल.

 

यापूर्वी अर्ज सादर केलेल्या, तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार कृषी सेवेसाठी पात्र ठरणाऱ्या पात्रताधारक उमेदवारांना कृषी सेवेचा पर्याय मिळणार आहे. नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. परीक्षेच्या दिवशी अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारांना कोणती परीक्षा द्यावयाची आहे, याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!