महत्त्वाच्या बातम्या

कोण असेल रतन टाटांचा उत्तराधिकारी ? संचालक मंडळाच्या बैठकीत झाला निर्णय-

        रतन टाटांच्या निधनानंतर त्यांचा कार्यभार सांभाळण्यासाठी नोएल टाटांची निवड केली आहे. नोएल टाटा हे रतन टाटांचे भाऊ आहेत. गेल्या 40 वर्षांपासून ते टाटा समूहाचा भाग आहेत. टाटा सन्स ही टाटा समूहाची मूळ कंपनी आहे. नोएल टाटा सध्या सर दोराबाजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. या दोन्ही ट्रस्टचा मिळून 66 % हिस्सा टाटा सन्स मध्ये आहे. नोएल टाटांवर अनेक कंपन्यांची जबाबदारी आहे. ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत. 
      आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रतन टाटांचे उत्तराधिकारी नोएल टाटा ठरले. नोएल टाटांनी सक्सेस विद्यापीठातून बॅचलरची  पदवी मिळवली आणि फ्रांस मधील INSEAD बिझनेश स्कूल मधे आंतरराष्ट्रीय कार्यकारी कार्यक्रमात सहभागी झाले. ते टाटा स्टील अँड टायटन कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष आहेत. आणि आता रतन टाटांच्या जागी  नोएल टाटा हे टाटा समूहाचे  अध्यक्षपद सांभाळतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!