महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूरातून दुचाकी चोरीस ; कराड मधून दोन संशयितांना अटक

      कोल्हापूर जिल्ह्यातून चोरीला गेलेली मोटरसायकल व त्यावरील संशयित चालकास कराड मध्ये अटक करण्यात आली आहे. दिनांक ४ जून रोजी कॉटेज  हॉस्पिटल कराड येथे वाहतूक नियमन कर्तव्यावर नेमण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबल एन. बी. पाटील व पोलीस कॉन्स्टेबल ए.डी.मुळे  यांच्या मुळे हे प्रकरण उघडकीस आले. अनिल हणमंतराव अखिलवाडी (वय 19 वर्ष) रा. हनुमंतराया लवंगी, तालुका बसवन बागेवाडी, जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक व सद्दाम शब्दिन शेख (वय 19 वर्ष) रा. गांधीनगर रेल्वे स्टेशन पलीकडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर अशी दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.
          सदर चे दोन्ही पोलीस कॉनस्टेबल आपले कर्तव्य पार पाडीत होते नियमन व वाहनांची कागदपत्रे चेक करत असताना संबंधित अंमलदार यांना पाच वाजून तीस मिनिटांच्या सुमारास डबल सीट मोटरसायकल चालवत येताना एक व्यक्ती  दिसला त्यांनी सदर मोटरसायकल चालकास थांबण्याचा इशारा देऊन बाजूला घेतले व मोटर सायकलची पाहणी करत असताना ही मोटरसायकल होंडा स्प्लेंडर असून तिचा नंबर एम एच 51 1597 असा होता. ही मोटरसायकल दुसऱ्या जिल्ह्यातील पासिंग असल्याने मोटरसायकल चालकास सदर गाडीची कागदपत्रांची मागणी केली. त्यानंतर दोघांनीही उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली. मोटरसायकल बाबत संशय आल्याने वाहतूक पोलिसांनी पोलिसांच्या नाकाबंदी ऍप  वरून खात्री केली. सदर मोटरसायकल चोरी बाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात जिल्हा कोल्हापूर येथे गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मोटर सायकल व त्यावरील चालक आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या इसमास शिरोळ पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर यांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
        ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड   अमोल ठाकूर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी, संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस के. ए.टीकोळे, पोलीस एम. बी. सावंत, पोलीस कॉन्स्टेबल एन.बी. पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ए.डी.मुळे यांनी कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!