गुरुग्राम येथे पुठ्ठ्याच्या गोडाऊनला भीषण आग
हरियाणा येथील गुरुग्राम येथे पुठ्ठ्याच्या गोडाऊनला आग लागली आहे. सेक्टर 21 मधील निवासी भागात असलेल्या गोडाऊनला आग लागल्याने खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 25 गाड्या हजर असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. घटनेचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. कार्डबोर्डच्या गोदामास आग लागल्याने ज्वाळांमध्ये वाढ होऊ लागली आग इतकी भीषण होती की, तिच्या ज्वाळा काही किलोमीटर दूर पर्यंत दिसत होत्या. सेक्टर 21 मधील लोकांच्या म्हनण्यानुसार येथे बेकायदेशीरपणे गोडाऊन बांधण्यात आले आहे. ते हटवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला लोकांनी आवाहन केले आहे. परंतु अजुनही कोणती कार्यवाही झालेली नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
