घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद
सायगांव ता. जावळी येथील सचिन प्रकाश ससाणे यांचे मालकिचे स्नॅक्स सेंटरच्या दुकानाला लावलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील रोख रक्कम १७,००० रूपये असलेली लोखंडी तिजोरी सह सॅमसंग कंपनिचा मोबाईल फोन असा एकुण १८,३०० रूपये किमतीचा मुद्देमाल व फिर्यादीची कागदपत्र असा ऐवज चोरून नेल्याची तक्रार मेढा पोलीस स्टेशनला या अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेच्या संदर्भाने मिळालेल्या गोपनिय माहीतीवरून श्री. सुधीर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे यांनी घडलेल्या घटनेबाबत मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक, मा. बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांना माहीती देवून त्यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेचे खास पोलीस पथक तयार करून अज्ञात आरोपीचा शोध घेणेस सुरवात केली. सदर गुन्ह्याचे तपासा दरम्याण मिळाले माहीतीचे आधारे संशयित इसम आदित्य विकास चव्हाण वय २० वर्षे रा. सायगांव ता. जावळी जि. सातारा यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने सखोल विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेनंतर सदर आरोपीस अटक करून त्याचेकडून त्याने चोरून नेलेल्या रक्कमेपैकी ५,००० रोख रक्कम, १,००० रू. किमतीचा मोबाईल फोन, व ३०० रू. किमतीची लोखंडी तिजोरी, व कागदपत्रे असा एकुण ६,३०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदर कारवाई सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई मा. बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाणेचे सपोनी सुधीर पाटील पोलीस उप-निरीक्षक गंगावणे, फौजदार शिंगटे, पो.हवा. माळी, पो.ना. शेख, पो.ना. रोकडे, पो.कॉ. काळे, पो.कॉ. वाघमळे, पो.कॉ. वाघमळे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पो. ना. शेख हे करीत असून, यांनी सदर कारवाई मध्ये सहभागी अधिकारी, अंमलदार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
