महत्त्वाच्या बातम्या

चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप; धंगेकर, राऊत आक्रमक

पुणे: राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीतील आंदोलना बाबत केलेल्या एका विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आणि वादाला तोंड फुटले आहे. जंतरमंतर वरील आंदोलना दरम्यान आंदोलक तरुणांच्या पायाचे ठसे दगडावर उमटले असून, ते ठसे ‘आधार’ (Aadhaar) शी लिंक करून त्यांची ओळख पटवली जात असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यांच्या या अजब ‘संशोधनावर’ विरोधकांनी तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले असून, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर खोचक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरून महायुती आणि विरोधकांमध्ये राजकीय वातावरण तापले असतानाच, विरोधकांकडून चंद्रकांत images - 2026-07-31T124314.851दादांच्या भूमिकेचा समाचार घेण्यात आला आहे. “लिंगपिसाट व्यक्तीच्या दर्शनामुळे चंद्रकांत दादांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे,” असा खोचक आणि तिखट टोला रवींद्र धंगेकर यांनी लगावला आहे. तसेच, चंद्रकांत पाटील यांच्या पुणे कार्यालयाची पुणे पोलिसांनी तपासणी करावी, असा उपरोधिक चिमटा काढत त्यांनी अनेक मुद्द्यांवर टीका केली आहे. विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले असून ते शांत आहेत, अशावेळी विनाकारण अशा वक्तव्यांमुळे वातावरण चिघळवणे योग्य नाही, असेही धंगेकर यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाची चांगलीच खिल्ली उडवली आहे. चंद्रकांत दादांनी एक अनोखे वैज्ञानिक संशोधन शोधून काढले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या संशोधनाची दखल घेऊन त्यांची थेट ‘नोबेल पुरस्कारासाठी‘ शिफारस केली पाहिजे, असा उपरोधिक सल्ला राऊतांनी दिला आहे. तसेच, त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू केले पाहिजे, अन्यथा देश एका महान संशोधकाला मुकेल, अशा शब्दांत राऊतांनी चंद्रकांतदादांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

नुकताच मीडियाशी संवाद साधताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीतील जंतरमंतर वरील आंदोलनावर भाष्य केले होते. दिल्ली पोलीस आणि एका युट्यूब व्हिडिओचा हवाला देत, आंदोलक तरुणांच्या पायाचे ठसे दगडावर उमटले आहेत आणि ते ठसे आधारशी लिंक करून त्यांची ओळख पटवली जात असल्याचा दावा पोलिसांच्या विश्लेषणावरून केला होता. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यभरात उमटत असून, सोशल मीडियापासून राजकीय पटलावर यावरून जोरदार उलट तपासणी सुरू आहे.

 

 

 

 

 

 

 

 

                                                    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!