चांदवडी येथे वॉटर एटीएमचे लोकार्पण
भुईंज : चांदवडी तालुका वाई येथे वॉटर एटीएमचे लोकार्पण वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते झाले.दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व क्लाऊड वर्क्स सोल्युशन कंपनी मार्फत पाणी शुद्धीकरणाचे मशीन देण्यात आले. चार लाख वीस हजार रुपये खर्च आला असून आला ग्रामपंचायतीने लोकसहभागातून२० टक्के रक्कम अदा करण्यात आली.
वॉटर एटीएम मशीन लोकार्पण सोहळ्यास ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त उपस्थित होते तसेच कंपनीचे चेअरमन व संचालक उपस्थित होते यावेळी त्यांच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या वतीने चांदवडी येथील प्राथमिक शाळेत वृक्ष लागवड करण्यात आले व शाळेची खेळणी रंगवण्यात आली. यावेळी गावाचे सरपंच फरीदा शेख उपसरपंच रामदास शिंदे उपस्थित होते.
यावेळीला गटविकास अधिकारी श्री.परीट म्हणाले, चांदवडी ग्रामपंचायतच्या मागणीनुसार वॉटर एटीएम मशीनच्या मागणीनुसार त्यांना दीपस्तंभ चार्ट व क्लाईव्ह व सोल्युशन कंपनी मार्फत संपूर्ण मिशन देण्यात आली. यामुळे गावाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार असून हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहणार आहे.
चांदवडी गावाने विविध उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे भविष्यात हे गाव जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत आपला वेगळा ठसा निर्माण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. घर सोलर योजनेबाबत श्री जाधव उप अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांनी मार्गदर्शन केले.
उपसरपंच रामदास शिंदे उपक्रमाबाबत सांगितले एटीएम मधून पाच रुपयांमधून दहा लिटर पाणी व दहा रुपयातून वीस लिटर पाणी मिळेल व सुनील शिंदे यांनी आभार मानले.पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मोरे व डी आर डी चे वायदंडे ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे रेखा शिंदे स्नेहल शिंदे यमुना काकडे पोलीस पाटील योगेश शिंदे नरेश वाघ अमोल शिंदे ज्ञानदेव पोळ शिंदे बचत गटाचे अध्यक्ष महिला व जेष्ठ नागरिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
