महत्त्वाच्या बातम्या

जपानच्या शिष्टमंडळाने घेतली मा. ना. शंभूराज देसाईंची भेट

    जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाने आज पर्यटन मंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांची त्यांच्या पावनगड निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपस्थित शिष्टमंडळाने पर्यटन वाढीच्या दृष्टीने देण्यात येत असलेल्या सवलती व योजनांची माहिती यावेळी महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडून जाणून घेतली. तसेच त्यांनी यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांशी संवाद साधून सविस्तर चर्चा केली. 

    यावेळी दोन्ही प्रांतांत सांस्कृतिक आदानप्रदान व्हावे आणि त्यातून राज्यातील पर्यटनालाही चालना मिळावी, याबाबत मा. ना. शंभूराज देसाई यांनी शिष्टमंडळाला आवाहन केले. तसेच जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी. पर्यटनातून दोन्ही प्रांतांतील परस्पर संबध अधिक वृध्दिंगत होतील, अशी भावना मा. ना. शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

     यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, जपानच्या वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे संचालक योशीओ यामास्ताचे, जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामाचे सोनोबे सॅन, महिरा हेदुयेकी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, अधीक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!