जम्मू काश्मीर मध्ये भाजपला मागे टाकत आम आदमी पार्टीच्या उमेदवाराचा विजय-
आम आदमी पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक यांनी जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरच्या निवडणुकीसाठी 14 सप्टेंबर रोजी डोडा येथील मैदानावर सभा घेतली होती. जम्मू काश्मीर च्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर मोदींनी ज्या मतदार संघात पहिली प्रचार सभा घेतली त्याच मतदार संघातुन भाजपाचा पराभव झाला आहे.
डोडा विधानसभा मतदार संघात आम आदमी पक्षाच्या मेहराज मलिक यांनी विजय मिळवला असून भाजपाचे उमेदवार गजय सिंग राणा यांचा पराभव झाला आहे. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एकसवरून मेहराज मलिक यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक होते. गेल्या 40 वर्षात या ठिकाणी भेट देणारे ते एकमेव पंतप्रधान ठरले होते परंतु याचा निवणुकीत काहीही फायदा न झाल्याचे दिसून येत आहे.
