जाधववाडीत विकासकामांचा वेग – ग्रामस्थ संतुष्ट
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून चाफळ विभागातील मोजे जाधववाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत आणि श्री हनुमान मंदिर सभा मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. या विकासकामांमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी जाधववाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्यानंतर, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला गती मिळाली. जाधववाडी व जंगलवाडी या गावांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली. यातील काही कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतिपथावर आहेत.
या विकासकामांसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रमुख कार्यकर्ते आणि विभागातील पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज गावातील अनेक सुविधा सुधारणेच्या मार्गावर आहेत.
गेल्या अनेक वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली नव्हती. त्यामुळे जाधववाडी व जंगलवाडी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
