जिल्हा परिषद शाळा, तडवळे येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शंभर टक्के पटनोंदणी
शिराळा : जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शंभर टक्के पटनोंदणी झाली. 15पैकी15 पैकी विद्यार्थी दाखल झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प व गोड खाऊ देऊन करण्यात आले.शिराळा पंचायत समितीचे आदरणीय गटशिक्षणाधिकारी पोपटराव मलगुंडे साहेब यांच्या हस्ते व बिऊर केंद्राचे प्रमुख सर्जेराव पाटील, सरपंच सौ . प्रियांका पाटील, उपसरपंच ,मा. ॲड.मारुती पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड, मुख्याध्यापक शिवाजी पाटील, शिक्षक मोहन पवार,माजी उपाध्यक्ष कृष्णात मोहिते, गौरी गायकवाड यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांना फेटा बांधण्यात आला होता. यावेळी पालक सचिन मोहिते, कमल पाटील, विनोद कांबळे व सर्व पालक उपस्थित होते.
