महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा सत्र न्यायाल्याच्या न्यायाधीशांनीच घेतली लाच…सातारा जिल्ह्यात खळबळजनक परिस्थिती

       सातारा जिल्ह्यातील सत्र न्यायालयाच्या न्यायधीशानेच लाच घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. 5 लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी न्यायाधीश  धनंजय निकम यांच्या सोबत 3 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून न्यायाधीशानेच लाच घेतल्याने जिल्ह्यात न्याय व्यवस्थेला तडा गेला आहे. ही घटना सातारा जिल्हा न्यायालयाच्या आवरातच घडली आहे.
        पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल  जामीन अर्जा संदर्भात मदत आणि जमीन करून देण्याबाबत 5 लाख रुपयांची मागणी केली. या संदर्भात पुणे सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तपणे कारवाई केली आहे. धनंजय  निकम सह इतर 3 जणांवर लाच लुचपत प्रतिबंधक कायदयान्वये सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाची तक्रार पुण्यातील एका तरुणीने दिली होती. महिला तक्रारदार यांच्या वडिलांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत कैद आहेत. त्यांनी सत्र न्यायालय  सातारा येथे जामीन अर्ज दाखल केला होता. सदरचाजामीन अर्ज हा धनंजय निकम जिल्हा व सत्र न्यायाधीश वअतिरिक्त सत्र  न्यायाधीश यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित होता. तो जामीन अर्ज मंजूर करून तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी खाजगी किशोर खरात व आनंद खरात यांनी लोकसभेत न्यायाधीश धनंजय निकम यांच्या सांगण्याप्रमाणे 5 लाख रुपयांचे मागणी केली.

      हा प्रकार 3, 9 आणि 10 डिसेंबर रोजी घडला. त्यानुसार आनंद मोहन खरात ( खराटवस्ती दहिवडी ता.माण) ,किशोर संभाजी खरात ( रा. वरळी मुंबई), धनंजय निकम व एक अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. 10 डिसेंबर रोजी आंनद खरात व किशोर खरात यांनी लाच स्वीकारण्याची तयारी दाखवून ठरलेली रक्कम गाडीत आणून द्या असे सांगितले. त्यांनतर लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी न्यायाल्याच्या आवरातील हॉटेल मध्ये सापळा रुचून गुन्हेगारांना रंगे हात पकडले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!