महत्त्वाच्या बातम्या

जेजुरी येथील अपघातात आठ जणांचा मृत्यू

      जेजुरी येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली. आज  सायंकाळी पावणे सात च्या सुमारास  किर्लोस्कर कंपनीच्या नजीक असणाऱ्या श्रीराम  ढाब्याच्या समोर जेजुरी मोरगाव रोड वर हा अपघात झाला. श्रीराम ढाब्याचे मालक वायसे हे त्यांच्या ढाब्यासाठी लागणारे  फ्रिज डिलिव्हरी पिकप मधून खाली उतरून घेत असताना स्विफ्ट डिझायरने अचानक पाठीमागून येऊन धडक दिली.  सदर अपघातामध्ये सात पुरुष  व  एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 पुरुष, 1 महिला व 2 लहान मुले जखमी आहेत. मृत पावलेल्या सात पुरुष व एक महिला यांचे शव जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे पोस्टमार्टमसाठी आणण्यात आले आहे.

       सोमनाथ रामचंद्र वायसे रा. नागरिक तालुका पुरंदर, जिल्हा पुणे,  संजीवनी रामू  यादव रा. नागरिक तालुका पुरंदर जिल्हा, पुणे,
अजय कुमार चव्हाण रा. उत्तरप्रदेश, अजित अशोक जाधव रा. कांजळे  तालुका भोर जिल्हा पुणे, किरण भारत राऊत  रा. पवारवाडी तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, अश्विनी  रा. सोलापूर,  अक्षय संजय राऊत रा. झारगडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे व एक अनोळखी पुरुष अशी अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.या अपघातात जखमी झालेल्या चौघांना शांताई हॉस्पिटल जेजुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!