महत्त्वाच्या बातम्या

ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचा उद्या प्रथम स्मृतिदिन

भुईंज : ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले (भाऊ) यांचा प्रथम स्मृतिदिन बुधवार दि. ७ रोजी होत आहे. भुईंज गावचे सरपंच, आमदार, कॅबिनेटमंत्री, खासदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्य व केंद्रीय समित्यांवर महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रतापराव भाऊ यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठविला. स्फटिकवत चारित्र्य व चरित्र राहिलेल्या या नेतृत्वाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त  भुईंज येथे हभप प्रमोद महाराज जगताप यांचे सकाळी १० वाजता किर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आमदार मदनदादा भोसले,व बंधू मोहनराव भोसले गजानन भोसले यांच्यासह भोसले परिवार आणि भुईंज ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!