महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टर वेळेवर न आल्याने तरुणाचा मृत्यू

     दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार न मिळाल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशीच एक घटना सातारा परिसरातील मंगलमूर्ती क्लिनिक अँड रिसर्च सेंटर मध्ये घडली आहे. डॉक्टर वेळेवर न आल्याने 26 वर्षीय तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. 
         सातारा शहरातील मंगलमूर्ती क्लिनिक अँड रिसर्च सेंटर येथे अक्षय नलवडे (रा.बोगदा परिसर)  वय  26  याचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर वेळेवर न आल्या कारणाने त्याचा  मृत्यू झाला. या घटनेने सातारा परिसरातील वातावरण तापलेले आहे. अक्षय वर काही दिवसांपासून या हॉस्पिटल मध्ये उपचार  सुरू होते. दि.27 रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता परंतु काल पुन्हा त्याच्या  तब्येतीमध्ये बिघाड झाल्याने त्याला आज सकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अक्षयला आपले प्राण गमवावे लागले आहे असे आक्रमक झालेल्या जमावाचा आरोप आहे. लोकांनी हॉस्पिटल बाहेर जमाव करून संबंधित डॉक्टर वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. 
      दवाखान्याबाहेर लोकांनी मोठ्या प्रमाणात  गर्दी केली असून पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. डॉक्टर वर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शव पोस्टमार्टमसाठी देणार नाही असे लोकांचे म्हणने आहे. पोलिसांनी लवकरात लवकर संबंधित डॉक्टर वर कायदेशीर कारवाई करावी अशी संतप्त जमवाची मागणी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर भूषण पाटील यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने सातारा येथे खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!