महत्त्वाच्या बातम्या

तडवळे येथे मुसळधार पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

शिराळा: तडवळे (ता. शिराळा) येथे झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारपिटीने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे गहू, मका पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली असून घराचे पत्रेही दूरवर जावून पडले आहेत. अजित पाटील, सखुबाई पाटील यांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने त्यांचे नुकसान झाले. रायसिंग पाटील, प्रकाश पाटील, श्रीरंग गायकवाड यांच्या गहू आणि मका पिकाचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी जनावरांसाठी ठेवलेल्या गवताच्या गंजी उडून गेल्या. तसेच पावसात भिजून नुकसान झाले. गारपीटीमुळे पोपट चिंचोडकर यांच्या ६५ कोंबड्या दगावल्या. तडवळे, उपवळे, बिऊर या गावांनाही पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. घटनेचा पंचनामा तलाठी सुनील जावीर, ग्रामसेवक प्रभावती भोसले, नंदू दाभाडे यांनी केला. यावेळी सरपंच प्रियांका पाटील, ॲड . स्वप्निल पाटील, पोलीस पाटील वैशाली पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!