तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक, आज न्यायालयात हजर होण्याची शक्यता
पुण्यातील स्वारगेट येथील एसटी डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दत्ता गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार घडल्यानंतर तब्बल १०० तासांनंतर त्याला अटक करण्यात आली.
गाडे हा शिरूर तालुक्यातील गुंजाळ गावातील असून तो विवाहित आहे आणि त्याला दोन मुले आहेत. तो वारंवार ठिकाणे बदलत होता, त्यामुळे त्याचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. अखेर पुणे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने त्याला शिरूर येथून अटक केली.
या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता गाडेला आज (शुक्रवार) दुपारी २ वाजता पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे या संदर्भात पत्रकार परिषद घेऊ शकतात.
