महत्त्वाच्या बातम्या

दहीवडी येथे मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न

दहिवडी: दहिवडी येथे मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च बेंगलोर (IIHMR-B) व व्दारा हेल्थ फायनान्स, वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने दहीवडी येथील फिनिक्स करिअर अकॅडमी येथे दि. 17 डिसेंबर 2025 रोजी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच रक्ताल्पतेसारख्या समस्यांची वेळीच ओळख पटवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

        या शिबिरामध्ये एकूण 50 विद्यार्थी व विद्यार्थिनींची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. प्रशिक्षित हेल्थ सखींच्या माध्यमातून अत्यंत सुरक्षित व शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या हिमोग्लोबीन पातळीची माहिती देण्यात आली तसेच कमी हिमोग्लोबीन आढळलेल्या विद्यार्थ्यांना सकस आहार, जीवनशैली सुधारणा व पुढील वैद्यकीय सल्ला घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी फिनिक्स करिअर अकॅडमीचे संचालक दिलीप शिरकुळे सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी IIHMR-B बेंगलोर व द्वारा हेल्थ फायनान्स, वडूज यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांचे कौतुक केले.
      यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च बेंगलोरचे प्रतिनिधी मोहन आचार्य तसेच द्वारा हेल्थ फायनान्सच्या हेल्थ सखी मीनाक्षी खुपसे, मधुश्री पडमलकर, दीक्षा रणपिसे, शाहीन मुलाणी व रोहिणी साळुंके आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
विद्यार्थ्यांनी या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूणच दहीवडी परिसरातील विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेले हे मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबीर अत्यंत उत्साहात आणि समाधानकारक वातावरणात संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!