दिवाळी सणानिमित्त राज्यात जीएसटी ची सर्वाधिक वसुली
गणपती,दसरा, दिवाळी या लागोपाठ आलेल्या सणांमुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली आहे.लोकांनी सणा निमित्त खरेदी केल्याने वस्तू व सेवा कराच्या वसुलीमध्ये जोरदार वाढ झाली आहे. सर्व राज्यापेक्षा महाराष्ट्रात जीएसटीचे कलेक्शन सर्वात जास्त झाले आहे. जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कराची ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी जाहीर झाली असून ऑक्टोबर महिन्याचा एकूण वस्तू व सेवा कर 1,87,346 कोटी रुपये आहे. त्यात CGST 33,821 कोटी तर SGST 41,864 कोटी रुपये आहे. एकूण जीएसटी कलेक्शन मधून 19306 कोटी जीएसटी रिफंड करण्यात आला आहे.मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत यावर्षी 18.2% वाढ जीएसटी कलेक्शन मध्ये पाहायला मिळाली आहे. ऑक्टोबर महिन्याचा IGST 54,878 कोटी आहे तर इम्पोर्टच्या बाबतीत IGST 44, 233 कोटी रुपये आहे.
राज्यातील जीएसटी कलेक्शन मध्ये वाढ झाली असून ही वाढ 14 टक्के आहे. ऑक्टोबर महिन्यात 31,030 कोटी रुपयांचे कलेक्शन झालं आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात,हरियाणा या राज्याच्या GST कलेक्शन मध्ये वाढ झाली असून हिमाचल प्रदेश, मणिपुर, आणि छत्तीसगड मधील जीएसटी वसुली मधे घट झाली आहे.
