देवापूर सरपंचपदी तात्यासाहेब औताडे यांची बिनविरोध निवड
माण तालुक्यातील देवापूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तात्यासाहेब औताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी पंचायत समिती माण किरण उदमले निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी सी.टी खाडे उपस्थित होते. तात्यासाहेब औताडे यांची सरपंचपदी निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची आतीषबाजी करत व गुलालाची उधळण करीत हलगीच्या निनादात ग्राम दैवतांचे दर्शन घेऊन संपूर्ण गावात मिरवणूक काढली.
यावेळी माजी सरपंच मंगला बाबासाहेब बनसोडे , उपसरपंच मंगला सयाजी चव्हाण, सदस्य शहाजी बाबर, तानुबाई बाबर, अलका चव्हाण, सविता बाबर, सुनिता कांबळे, निशिगंधा बनसोडे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. माण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या देवापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तात्यासाहेब औताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या सरपंच मंगला बनसोडे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी सरपंच पदाच्या निवडीसाठी शनिवार दि. ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सी.टी.खाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविण्यात आली होती . यावेळी सरपंच पदासाठी तात्यासाहेब औताडे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
सरपंचपदी निवड झाल्यानंतर तात्यासाहेब औताडे यांना किसान काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष कृषी मित्र प्रा.विश्वंभर बाबर, माजी सरपंच शहाजी बाबर, लाडकी बहिण योजनेचे माण तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पुकळे,ॲड. विठ्ठल वीरकर, विजयशेठ बनगर, निवृत्त ए. पी.आय रमेश लोखंडे सुलोचना बाबर, माजी सरपंच मंगल बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, राजू माने, पत्रकार विशाल माने यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल काटकर सर यांनी सुत्रसंचालन केले व मोहन बाबर यांनी आभार मानले.
