महत्त्वाच्या बातम्या

“धाव म्हाधा धाव”.. च्या नामघोषात कावडी मुंगी घाटाच्या वर शिवनामघोषाने शिखर शिंगणापूर नगरी दुमदुमली

       लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूरच्या दिशेने सरसावलेल्या कावडी मुंगी घाटातून महादेवा धाव म्हणत शंभू महादेवाच्या मंदिराच्या दिशेने रवाना झाल्या. शंभू महादेव यात्रोत्सवाचा बुधवार  मुख्य दिवस होता. यात्रेचा मुख्य आणि पाचव्या दिवशी मुंगी घाटातून वर चढल्या. भाविकांनी केलेल्या शिवनामाघोषाच्या जयजयकरांनी शिखर शिंगणापूर नगरी अगदी दुमदुमून गेली. सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात शिखर शिंगणापूरच्या कावडीचा उत्साह पहायला मिळाला. सुमारे १००० हून अधिक कावडी शिखर शिंगणापूरमध्ये दाखल झाल्या होत्या. अनेक कावडी मानाच्या होत्या. यामध्ये सर्वात मोठी कावड आणि प्रथम मानाची कावड म्हणून मान असणाऱ्या सासवडच्या तेल्या भुत्याच्या कावडीने देखील दिवस मावळण्याआधीच मुंगी घाट वर चढला. तेल्या भुताच्या कावडीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली होती.

     

          यात्रेतील भाविक भक्त यात्रेकरू पर्यटक यांचा उत्साह पाहता सर्व वातावरण शिवमय झाले होते. शंभू महादेवाला हाका मारत कावडींनी मोक्याच्या ठिकाणांवर देखील मात करत चढणीचे अडथळे यशस्वीपणे पार केले. गेले पाच दिवस ही यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत असून भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. परंतु यात्रेमध्ये असणाऱ्या भाविकांना सुख सोयीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन बैठकी लावल्या होत्या त्या बैठकीमध्ये यात्रेकरूंसाठी सुविधा देण्यासाठी प्रशासनाला ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याचे काटेकोरपणे पालन करत यात्रा अतिशय आनंदमय वातावरणात पार पडली. या कावड यात्रेसाठी मराठवाड्यामधील बीड लातूर उस्मानाबाद, यासोबतच विदर्भ, कर्नाटक,आंध्रप्रदेश इत्यादी राज्यांतून देखील लाखो भाविक दाखल झाले होते. सातारा जिल्ह्यातील मोठ्या यात्रेंपैकी एक असणाऱ्या या कावड यात्रेसाठी सुमारे पाच लाख भाविकांनी शंभू महादेवाचे दर्शन घेतले.

 

सह्याद्री ट्रेकर्सचे मोलाचे योगदान

     मुंगी घाटातून कावडी वर चढवताना दोनजण कोसळून जखमी झाले आहेत. त्यांना सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर यांनी मोठ्या कसरतीने जखमीना वरती काढून आदर्श कामगिरी बजावली. जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

पोलीस प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन यशस्वी

दहिवडी व म्हसवड पोलीस ठाणेचे  सपोनि. अक्षय सोनवणे आणि दत्तात्रय दराडे  यांनी नियोजनाप्रमाणे उत्कृष्ट चोख कामगिरी बजावील्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.यावेळी पोलीस प्रशासनास पोलीस पाटील संघटनेचे विशेष सहकार्य लाभले आणि आदर्श यात्रा पार पडण्यामध्ये त्यांना यश आले.

 

तेल्या भुत्याची कावड यात्रेचे मुख्य आकर्षण

सासवड येथून निघणाऱ्या आणि शंभू महादेवाच्या यात्रेत प्रथम मानाचे कावड म्हणून मान असणाऱ्या तेल्या भुत्याची कावड ही यात्रेचे मुख्य आकर्षण होती. या कावडीमुळे यात्रेतील इतर कावडीधारक आणि भाविक यांच्या उत्साहाचे वातावरण तयार होते. यामुळे ही कावड यात्रेचे मुख्य आकर्षण ठरली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!