नवी मुंबई महापे वाहतूक शाखेने घेतली रिक्षाचालकांची शाळा; नियम पाळण्याचे केले आवाहन
नवी मुंबई: नवी मुंबईतील रिक्षा चालकांना वाहतुकीचे कायदेशीर नियम सांगण्यासाठी महापे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी रिक्षा चालकांची शाळा घेतली. त्यामध्ये त्यांनी आवर्जून सांगितले की प्रवाशांना ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी प्रवासी सुरक्षित पोहोचला पाहिजे व कोणत्याच प्रकारचे अतिरिक्त भाडे आकारता कामा नये. आपण रिक्षा चालक आहोत असे प्रवाशांना समजण्यासाठी रिक्षा चालकांना जो नेमून दिलेला युनिफॉर्म आहे तो युनिफॉर्म रिक्षा चालकाने परिधान केला पाहिजे. रिक्षा चालविता वेळी रिक्षा चालकाने बॅच लावणे, सोबत कागदपत्रे ठेवणे व अतिरिक्त प्रवासी वाहतूक न करणे, प्रवाशांशी सौजन्याने वागणे याबाबतचे धडे महापे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी रिक्षा चालकांना गिरवले. यावेळी रिक्षा चालकांनी देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत नियमाचे पालन करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा नंदकुमार कदम यांना दिले.
दरम्यान अतिरिक्त भाडे न घेता रिक्षा चालकांची विश्वासार्हता ही प्रवाशांना जाणवली पाहिजे. व प्रवाशांना सुरक्षित रित्या विना अपघाता शिवाय त्यांचा प्रवास सुखाचा होईल अशा प्रकारचे रिक्षा चालक म्हणून कर्तव्य
केले पाहिजे. अशा सूचना देखील नंदकुमार कदम यांनी दिल्या. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी जाधव , अहिरे, ठाकूर, इत्यादी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
