परीक्षा केंद्रावर बुरखा नको नितेश राणेंची मागणी, शिक्षण मंत्र्यांना थेट पत्र
राज्यातील परीक्षा केंद्रांवर बुरखा आणि हिजाब घालण्यास बंदी घालावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना थेट पत्र पाठवले आहे. परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, परीक्षा केंद्रांमध्ये कोणत्याही प्रकारची गैरप्रकार होऊ नयेत यासाठी चेहरा झाकणाऱ्या वेशभूषेवर बंदी घालावी. यामुळे ओळख पटवणे कठीण होते आणि गैरवापर होण्याची शक्यता वाढते. परीक्षा केंद्रांमध्ये फसवणूक आणि बनावट उमेदवार येण्याचे प्रकार याआधी समोर आले आहेत, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
या मागणीवरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. काही घटक याला धार्मिक मुद्द्याशी जोडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने योग्य विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी काही मंडळांकडून केली जात आहे. बारावीची परीक्षा येथे 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ती आक्रमणास पर्यंत असणाराय तर येत्या 31 फेब्रुवारी पासून ते 17 मार्चपर्यंत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे तरी ज्ञान या परीक्षांसाठी वेळापत्रकातून ते हॉल तिकीट आणि परीक्षा केंद्र या सर्वांचं नियोजन झालं असताना परीक्षा सुरू असताना होणाऱ्या कॉफी संदर्भात भाजप नेत्यांनी मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी एक मोठी मागणी केली आहे.
या मागणीवर शिक्षण विभाग आणि राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी कर्नाटकातही अशा प्रकारचा मुद्दा चर्चेत आला होता. राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे.
