पर्यटन,खनिकर्म मंत्री मा.ना.शंभूराज देसाई आणि उदयोग मंत्री मा.ना उदय सामंत यांच्या उपस्थितीत राजवी ऑईल मिलचे भूमीपूजन संपन्न
शेटफळ रोड,माढा येथे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री मा.ना.शंभूराज देसाई आणि उदयोग मंत्री मा.ना उदय सावंत याच्या प्रमुख उपस्थितीत शेटफळ रोड, ता. माढा येथील माढा शहर व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या राजवी अॅग्रो ऑईल इंडस्ट्रीज प्रा.लि. मिलच्या भूमीपूजन कार्यक्रमास संपन्न झाला. या प्रकल्पात सोयाबीन पासून तेलनिर्मिती केली जाणार आहे. यासाठी प्रतिदिन 500 टन इतके सोयाबीन लागणार आहे. प्रतिदिन १०० टन रिफायनरी तेलाची निर्मिती होणार आहे. या मिलचा शेतकऱ्यांना सर्वाधिक मोठा फायदा होणार आहे.
माढा तालुक्यासह बार्शी, धाराशिव व लातूर जिल्ह्यातून सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेत असल्याने या ठिकाणाहून शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केली जाणार आहे. या ठिकाणी 400 ते 450 जणांना प्रत्यक्ष रोजागार निर्माण होणार असून तीनशेहून अधिक जणांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.या भूमीपूजन प्रसंगी, प्रा.शिवाजीराव सावंत, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार राजन पाटील, यांसह महायुतीचे पदाधिकारी, राजवी ऑईल मिलचे कर्मचारी उपस्थित होते.
