पश्चिम महाराष्ट्राकडे मंत्रीमंडळातील ही खाती
विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्या नंतर सर्वांचे लक्ष निवडून आलेल्या उमेदवारांना कोणते खाते मिळणार याकडे होते. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप झाले आहे.जावळी मतदार संघातुन निवडून आलेले आ.शिवेंद्रराजे भोसले यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्या नंतर आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग खाते शिवेंद्र महाराजांच्या वाट्याला आले आहे. तसेच पर्यटन , खनीकर्म आणि सैनिक कल्याण खाते ना. शंभूराज देसाई यांना देण्यात आले आहे. ना. जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामीण विकास व पंचायत राज खाते दिले असून ना. मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन खाते देण्यात आले आहे.
