महत्त्वाच्या बातम्या

पाचवड नजीक महामार्गावर झालेल्या इनोव्हा कार व कंटेनर अपघातात दोन महिला मृत तर चारजण जखमी

     साताऱ्यातील पाचवड येथे महामार्गावर एक दुःखद घटना घडली आहे .कार आणि कंटेनर चा भीषण अपघात झाला आहे. हे कुटुंब रमजान सणासाठी सातारहून पुणे येथे खरेदीसाठी निघाले होते.  याबाबत घटनास्थळ व भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड नजीक पुणे बाजूकडे निघालेल्या इनोव्हा कार क्रमांक MH11 BK 1567 या कार ने महामार्गावर एक नंबर लेन ला बंद पडलेल्या ट्रेलर क्रमांक MH14 JL 2473 ला पाठीमागाहून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात इनोव्हा कार मधील महिला सलमा इरफान मोमीन (वय 40) राहणार सांगली‌, व नईदा समीर शेख (वय 39) राहणार सातारा या दोघीही गंभीर रित्या  जखमी होत्या. त्यांना अधिक उपचारांसाठी सातारा येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वी ते मृत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
       तर इनोव्हा कार मधील इरफान इकबाल मोमीन, कैफ इरफान मोमीन, बशीर मामूद शेख, व चालक सलमान पठाण सर्वजण राहणार शनिवार पेठ सातारा चे रहिवासी आहेत. हे गंभीर जखमी असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत. मृत महिला या नात्याने एकमेकींच्या नणंद भावजय लागतात व हे सर्वजण कुटुंब रमजान सणाच्या खरेदीसाठी पुण्याला निघाले होते, पण पाचवड येथेच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
     दरम्यान या अपघातानंतर मागेच असलेल्या वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम व भुईंज पोलीस स्टेशन चे हवालदार चंद्रकांत भोसले, अरुण दगडे, वाहतुक पोलीस मंदार शिंदे यांनी तातडीने अपघात स्थळी येऊन मदतकार्य दिले. जखमींना सातारा येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले.या अपघाताची भुईंज पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजीराव तोडरमल करीत आहेत.
     घटनास्थळी थेट DYSP बाळासाहेब भालचिम..
 साहेब सकाळी सातारा येथे परेड करून परतीच्या प्रवासात असलेले वाई चे डी वाय एस पी बाळासाहेब भालचिम हे अपघातानंतर काही मिनिटांतच पोहोचले आणि  तात्काळ मदतकार्य मिळाले घटनास्थळी त्यांचे ड्रायव्हर व सहकारी कॉन्स्टेबल यांनी वहातुक व्यवस्था सुरळीत केली.

 रमजान चे उपवास व यातील काही जखमींचे हातात असलेली जपमाळ आणि नातेवाईकांचा आक्रोश खूप काही सांगून गेला.

 भुईंज चे ग्रामीण रुग्णालय सुरू असते तर यातील जखमींचे प्राण वाचले असते अशी चर्चा पांचवड ग्रामस्थ करीत होते.

4. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पहाटेपासूनच एक नंबरच्या लेनवर कंटेनर बंद पडला होता मात्र आनेवाडी टोल नाका व खंडाळा घाट या ठिकाणी नेहमीच ट्राफिक हवादारांचा राबता असतो मात्र आनेवाडी टोल नाक्यावर जाणाऱ्या एकाही ट्रॅफिक वाल्याने कंटेनर एक नंबर लेंनवर बंद पडला आहे इथे अपघात होऊ शकतो याची काळजी घेतली असती तर कदाचित हा अपघात घडला नसता असेही अपघात स्थळी लोक बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!