महत्त्वाच्या बातम्या

पाषाण परिसरात काळजीवाहकांनीच जोडप्याला घातला गंडा; तब्ब्ल 35 लाखांची फसवणूक

         पाषाण परिसरात तब्ब्ल 35.50 लाख रुपयांच्या चोरीची घटना घडली आहे.एका वृद्ध व्यक्तीची काळजी घेण्यासाठी नियुक्त केलेल्या दोन काळजीवाहकांनीच घरातून चेक आणि एटीएम कार्ड चोरले आहे तसेच बनावट स्वाक्षऱ्या करून तब्बल ३५.५१ लाख रुपये लंपास केले आहेत. याची चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ७१ वर्षीय गिरीजा बाला चंद्रन यांनी त्यांच्या पतीची काळजी घेण्यासाठी 2 जणांना ठेवले होते. त्याच काळजी वाहकांनी घरात चोरी केली आहे. गुन्ह्यातील आरोपींची ओळख पटली असून  आकाश ज्ञानेश लिमकर हा वारजे माळवाडी तर   आदित्य संजय मोरे हा पाषाण येथील रहिवासी आहे. 
        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२५ दरम्यान कामावर ठेवण्यात आले होते. या दरम्यान आरोपींनी जोडप्याचे चेकबुक आणि एटीएम कार्ड चोरल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर चेकवर वृद्ध व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या खोट्या करून एटीएम व्यवहारांद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे काढल्याचा आरोप देखील आहे. गिरीजा यांना खात्यातील रकमेत फेरफार झाल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून आरोपी फरार आहेत. याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!