महत्त्वाच्या बातम्या

पिरंगुट येथील पार्टीत एकावर झाडल्या गोळ्या… मित्रांमधील वाद ठरला जीवघेणा

    पुण्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मित्रांमधील वाद हा टोकाला गेल्याने एकाच्या जीवावर बेतले आहे.रविवार पिरंगुट येथे पार्टी मध्ये एकावर गोळीबार करण्यात आला. रविवारी पहाटे ही घटना घडली. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या 25 वर्षीय तरुणाला डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ओंकार उर्फ सनी गोळे राहणार पिरंगुट असे जखमी तरुणाचे नाव आहे.

     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान सनीच्या गोठ्यावर ही घटना घडली. सावकारवाडी येथे सागर उर्फ ऋषिकेश संभाजी गोळे यांनी पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीमध्ये दारू पिण्याच्या कारणावरून मित्रांमध्ये वाद सुरू झाला. या पार्टीत शुभम गोळे, महेश कदम, स्वराज म्हस्कुटे, संकेत सोनवणे, जन्मेजय जगताप हे सर्वजण एकत्र आले होते. पार्टीत वाद झाल्यामुळे शुभम गोळे, सागर गोळे, महेश कदम, संकेत सोनवणे, यांनी सनीला मारहाण करायला सुरुवात केली आणि शुभम गोळे ने पिरंगुट मध्ये फक्त माझीच चालणार असे ओरडत सनीला शिवीगाळ देखील केली. या वादामध्ये प्रत्युत्तर दिल्यानंतर शुभमने त्याच्यावरती गावठी पिस्तूलने गोळीबार केला. गोळीबारामध्ये सनी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या पोटात गोळी लागल्याने त्याला डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. गोळीबाराची घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून शुभम आणि संकेत सोनवणे हे पसार झाले आणि इतरांनी देखील तेथून पळ काढला.

      यामध्ये ऋषिकेश गोळे यांने सनीला रुग्णालयात दाखल केले. या घटनेने पिरंगुट परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सागर उर्फ ऋषिकेश संभाजी गोळे (वय 31) आणि महेश तानाजी कदम (वय 24) राहणार पिरंगुट या दोघांना अटक केली असून शुभम संभाजी गोळे  व संकेत सोनवणे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर दोघा जणांचा शोध सुरू असून पोलीस उपनिरीक्षक पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!