महत्त्वाच्या बातम्या

पुणे जिल्ह्यातील  तहसील कार्यालयात एजंटसह दोघांना एसीबीकडून रंगेहात अटक

 

पुणे — शिरूर तहसील कार्यालयात मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पुणे पथकाने  2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने जमीन संबंधित सातबारा व फेरफार नोंदी मिळविण्यासाठी शिरूर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी आरोपी सूरज शरद थोरात (वय 34), एजंट व कंत्राटी कर्मचारी, तसेच महेश बाबूराव भोसले (वय 45) यांनी  2 हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने याबाबत एसीबी पुणे येथे तक्रार दिल्यानंतर 20 मार्च रोजी सापळा रचण्यात आला.  कारवाईदरम्यान आरोपी सूरज थोरात याने तक्रारदाराकडून 2 हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला सापळा रचून  रंगेहात पकडले.  महेश भोसले यालाही  या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!