महत्त्वाच्या बातम्या

पुणे झेडपीचे ‘सीईओ’ गजानन पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

     महाराष्ट्र सरकार आणि भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘कार्यालयीन मूल्यमापन – १०० दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत राज्यात तृतीय क्रमांक पटकावलेले पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गजानन पाटील यांचा बुधवारी (दि. ७ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या गौरवाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी सीईओ पाटील यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत, त्यांना शुभेच्छा दिल्या. मुंबईत आयोजित करण्यात आला आलेल्या या कौतुक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार,  सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत कार्यालयीन कार्यपद्धती, कार्यक्षमता, पारदर्शकता, नागरिकांशी संवाद, वेळेत सेवा देणे अशा विविध घटकांवर मूल्यांकन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!