महत्त्वाच्या बातम्या

पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात 9 जणांचा मृत्यू

   पुण्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची  घटना घडली आहे. या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. नारायणगावाजवळ हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो पुढे फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स ऑटो  आपटली. यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर तिघे जखमी आहेत.
        या अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धाव घेतली. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांमध्ये यात चार महिला, चार पुरुष आणि एका लहान बाळाचा देखील समावेश आहे. जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
       घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – नाशिक महामार्गावरती एसटीच्या मागे मॅक्स ऑटो जात होती. तर त्याच्या पाठीमागून आयशर टेम्पो प्रवास करत होता. आयशरने जोरात धडक दिल्याने  मॅक्स ऑटो हा बसवर जाऊन आपटली. दोन्ही गाड्यांच्यामध्ये आल्याने मॅक्स ऑटो मधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. तर काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  या अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांनाप्रती मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. तर त्यांनी मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबतची पोस्ट त्यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे. “पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे”, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!