महत्त्वाच्या बातम्या

पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवरच केला चौघांनी हल्ला; खडकी परिसरात नेमकं काय घडलं?

     पुण्यातील खडकी परिसरातुन एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चक्क पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनाच 4 जणांच्या टोळीने मारहाण केल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार 31 जुलैच्या रात्री घडली. खडकीतील चर्च चौक परिसरात दोन पोलिसांना आज्ञातांनी मारहाण केली ते दोघे रात्री पेट्रोलिंग ड्युटीवर होते. गोपाल देवसिंग कोतवाल व काळजे अशी या मारहाणीत जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
       दरम्यान, एक वाहन चालक अत्यंत वेगात आणि वेड्यावाकड्या दिशेने गाडी चालवत आहे असे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्या गाडीला थांबवून वाहनचालकाची   चौकशी करू लागले परंतु शुल्लक कारणावरून गाडीत बसलेल्या चौघांनी पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. संबंधित पोलिसांनी खडकी पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे. जुनेद इक्बाल शेख (वय 27), नफीज नौशाद शेख (वय 25), युनूस युसुफ शेख (वय 25), आरिफ अक्रम शेख (वय 25) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!