प्रसिद्ध रॅपरचा भीषण अपघात; शूटिंग करताना एमीवेच्या डोक्याला दुखापत
एका फेमस रॅपरचा भीषण अपघात झाला आहे. शूटिंग करत असताना त्याचा अपघात झाल्याची माहिती एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतून समोर आली आहे. एमीवे बंटाई असं रॅपर आणि गायकाचं नाव आहे. त्याच्या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एमीवेनं शारजामधील एक स्टंट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो एका वेगात धावणाऱ्या टोयोटा SUV गाडीच्या बाहेर अर्धवट लटकलेला दिसतो. गाडीने वळण घेतल्यावर तो गाडीच्या खिडकीतून बाहेर पडतो व त्याच्या डोक्याला दुखापत होते याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या अपघातामुळे एमीवेला गंभीर दुखापत झाली असून, नेमकी जखम किती तीव्र आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हा अपघात हेतुपुरस्सर स्टंट करताना घडला की चुकून घडलेला प्रकार आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. एमीवे ने स्वतः आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हीलॉग टीझर शेअर केला आहे, ज्यात अपघाताचा क्षणही टिपलेला आहे. दुबईमध्ये आपल्या आगामी म्युझिक व्हिडीओच्या शूटिंगदरम्यान तो अपघातग्रस्त झाला आहे.
कोण आहे भारतीय हिप-हॉप जगतातील प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाई
एमीवे बंटाई याच खरं नाव मोहम्मद बिलाल शेख आहे. तो
मुंबई शहरातून आहे. त्याला रॅप संगीतातील त्याच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जाते, ज्यामध्ये तो त्याच्या दैनंदिन जीवनातील अनुभव, सामाजिक समस्या आणि राजकीय विषयांवर गाणी लिहितो. एमीवेने 2013 मध्ये ‘गल्ली बॉय’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले, आणि त्यानंतर त्याने अनेक लोकप्रिय गाणी दिली. ‘समझ में आया’, ‘ Burada’ आणि ‘Mafia Mundeer’ सारख्या त्याच्या गाण्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली.
