बलिदान मासा निमित्त सायगाव येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर यशस्वीपणे संपन्न.
सायगाव : ता.जावलीयेथे संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तपासणी शिबिर, मोतीबिंदू नियंत्रण शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराचा समावेश होता. या कार्यक्रमात सातारा जिल्हा ग्रामसेवक संघाचे सरचिटणीस संदीप सावंत यांनी संभाजी महाराजांचे गुण फक्त आदर्श म्हणून न ठेवता प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
या प्रसंगी सरपंच बाळासाहेब कांबळे, पोलिस अधिकारी सचिन, फौजी निखिल राजमाने, प्रशांत सेना प्रमुख उपस्थित होते. सरपंच बाळासाहेब कांबळे यांनी विविध जाती-धर्मातील तरुणांनी आदर्श संस्कार जोपासण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले.
रक्तदान शिबिरात अक्षय अर्वथ, संकेत जाधव, उदय पवार, श्रीकांत देशू, शेखर धुमाळ, अतुलवंत सावंत यांसह अनेक तरुणांनी सहभाग घेतला. या सामाजिक उपक्रमामुळे संभाजी महाराजांचे बलिदान आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
