महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार सामना!

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. हा कारखाना राज्याच्या सहकार क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो. या निवडणुकीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी चुरस पाहायला मिळणार आहे.

     उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) चे युवा नेते युगेंद्र पवार यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली असून पक्षप्रमुख शरद पवार यांच्या सूचनेनुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर, माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना रंगणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!