महत्त्वाच्या बातम्या

बिदालच्या उदयोन्मुख हरहुन्नरी रिलस्टार कलाकराचा अपघाती मृत्यू

       माण तालुक्यातील बिदाल गावचा उदयोन्मुख हरहुन्नरी कलाकार विराज ऊर्फ गणेश युवराज जगदाळे (वय १६ वर्ष) यांचा आज दुर्दैवीरित्या अपघाती मृत्यू झाला. मोटारसायकलचा टायर फुटल्याने झालेल्या या अपघाताने बिदाल गावावर शोककळा पसरली आहे. विराज हा बुधवार दि. ४ जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत मोटारसायकलवरुन दहिवडीला निघाला होता. बिदाल ते दहिवडी रस्त्यावरील बिदाल हद्दीतील सावता माळी वस्ती नजीक मोटारसायकल आली असता अचानक गाडीचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे मोटार सायकलवरील नियंत्रण सुटले. त्यातच मोटार सायकलवर पाठीमागे बसलेला विराज हा डांबरी रस्त्यावर पडला. यामुळे विराजच्या डोक्याला जोरदार मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ दहिवडी येथे हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

         इयत्ता दहावीत गेलेल्या विराजने कमी वयात अनेक कलांमध्ये प्राविण्य मिळवले होते. अतीशय गरीब घरातील विराज चांगली कुस्ती खेळत होता. ग्रामीण रिलस्टार म्हणून तो नावारूपाला आला होता. शाळेत सर्व खेळांमध्ये हिरीरीने भाग घेताना तो अभ्यासात कमी नव्हता. मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारा, म्होरकी, वेसण यासोबतच बिदालचे वैशिष्ट्य असलेले बैलाची तोरण बनविण्यात माहीर असणारा विराजचा अचानक मृत्यू झाल्याने बिदाल कर सुन्न झाले.विराजच्या अकाली जाण्याने त्याचे आईवडील व बहिणीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!