बिरोबा मंदिर ते महादेवदरा रस्त्याची दुरावस्था; दुरुस्ती करावे अन्यथा आंदोलन करणार- शरद दडस
दहिवडी: माण तालुक्यातील पांगरी-बिरोबा मंदिर ते महादेवदरा हा रस्ता सन २००८-०९ मध्ये स्थानिक आमदार निधीतून ६ किमीचा करण्यात आला होता. गेल्या १५ वर्षापासून सदरचा रस्ता कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झाली नसल्यामुळे हा रस्ता पुर्णता:हा खराब झाला आहे. तरी संबंधित प्रशासनाने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा 26 जानेवारी रोजी सातारा येथे जिल्हाधिकार्यालय समोर आमरण उपोषण करणार आहे असा इशारा शरद दडस यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की गेल्या दोन वर्षापासून या रस्तावरून वाहनांना जाणे अत्यंत अवघड झाले आहे. हा रस्ता प्रामुख्याने सतोबा-बिरोबा देवस्थानाला जाणारा प्रमुख मार्ग आहे. मार्गावरून माळशिरस, इंदापूर, अकलूज तसेच मराठवाड्यातील ही भाविक भक्त देखील जातात. तरी वाहनांचे टायर फुटणे,पंक्चर होणे अश्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या रस्तावरून जाणारे बरेच वाटसरू जखमी झाले आहेत. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आणि या रस्ताबाबत स्थानिकांच्या भावना तीव्र आहेत. याकडे प्रशासन, शासन व ग्रामविकासमंत्री तसेच स्थानिक लोकप्रतीनिधीं दुर्लश करत आहेत. असे मत शरद दडस यांनी व्यक्त केले आहे.
