महत्त्वाच्या बातम्या

भाजपचा उत्तर मुंबई अध्यक्ष ‘बांगलादेशी’

       भारतीय जनता पक्षाचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे हिंदुस्थानी नागरिकत्व घेतल्याची तक्रार मला प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी चालू आहे. रुबेल जोनू शेख याला अटक करण्यात आली असून चौकशीत तो बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे नागरिकत्व मिळविले असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. रुबेल हा भाजपचा पदाधिकारी असून या पक्षाने कोणतीही शहानिशा न करता त्याला पद कसे दिले.           बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणाऱ्या अशा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काही समाजविघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भाजपघेणार का? असा प्रश्नसुद्धा महेश तपासे यांनी उपस्थित केला होता. तसेच ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने याची चौकशी करण्याबाबतचे निवेदन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले होते.
      तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नादिया पच्छीम बंगला येथील रेकॉर्ड तपासून पाहिले असता रुवेलकडे असलेला दाखला हा दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावर असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी रुबेलच्या घरात सापडलेला शाळा सोडल्याबाबतच्या दाखल्याचे जिल्हा शाळा निरीक्षक एस. जि. नादिया, राज्य पश्चिम बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिले असता सदर दाखल्यामध्ये नमूद करण्यात आलेली बोलगंडा आदर्श हायस्कूल, बोलगंडा जि. नादिया ही शाळाच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. याच सर्व खोट्या कागदपत्रांच्या आधारावर त्याने आधारकार्ड व पॅनकार्डसुद्धा काढल्याचे तपासात समोर आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
 पश्चिम बंगालमधील खोटी कागदपत्रे
पोलिसांनी तपास केला असता चौकशीदरम्यान त्यांच्या घरात पश्चिम बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, जिल्हा-२४ उत्तर परगणा येथील ग्रामपंचायत रहिवाशी दाखला तसेच बोलगंडा आदर्श हायस्कूल जिल्हा-नादिया येथील शाळा सोडल्याचा दाखल मिळाला होता. पोलिसांनी मलापोटा ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी केली असता रुबेल जोनू शेख या नावाचा कोणताही रहिवासी दाखला देण्यात आलेला नाही अशी माहिती समोर आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!