भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रेणुताई येळगावकर यांची दिशा समिती वर निवड
भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रेणुताई येळगावकर यांची दिशा समितीवर निवड झाली आहे. ही समिती जिल्हाच्या प्रशासकीय कामांमध्ये महत्त्वाची समजली जाते. दिशा समिती म्हणजेच जिल्हा विकास समन्वय संनियंत्रण समितीवर रेणू येळगाव कर यांची नियुक्ती झाली असून तत्यांनी गेली दहा वर्ष भाजपमध्ये त्यांनी वेगवेगळ्या आघाडीवर काम केले आहे. भाजपा सदस्य नोंदणी मध्ये त्यांना कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. दिलेल्या कामाची जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडत असल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी रेणू येळगावकर यांच्या निवडीसाठी सदर समितीमध्ये शिफारस केली होती. या निवडीबद्दल पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
