भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जय भीम पदयात्रेचे आयोजन
पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग व यश फाऊंडेशन व डॉ. सिध्दार्थ धेंडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जय भीम पदयात्रेचे 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.30 वा. विभागीय क्रीडा संकुल, शास्त्रीनगर, येरवडा येथे आयोजन करण्यात येणार आहे.विभागीय क्रीडा संकुल, शास्त्रीनगर, येरवडा येथून पदयात्रेस प्रारंभ होणार असून लुंबिनी उद्यान, नागपूर चाळ आणि समारोप लुंबिनी उद्यान, नागपूर चाळ येथे होणार आहे. या पदयात्रेमध्ये स्थानिक मंत्री, खासदार, आमदार, लोक प्रतिनिधी, युवा व क्रीडा पुरस्कार विजेते, तसेच सुमारे 250 विद्यार्थी व युवक-युवती सहभागी होणार आहे. जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय कार्यालय अधिनस्त अधिकारी, कर्मचारी, युथ ॲवार्डी, विविध शाळा, क्लब, मंडळ, महिला,नागरिक, नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट गाईड स्वयंसेवक, क्रीडा शिक्षक आदी सहभागी होणार आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, युवक कल्याण क्षेत्रात काम करणारे युवक, युवती व संस्था, महिला मंडळे तसेच नागरिकांनी या पदयात्रेत सहभागी घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
