महत्त्वाच्या बातम्या

भुईंज पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये सीसीटीव्हीचा अभाव

     भुईंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करता बहुतांश ठिकाणी  सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचणी येत आहेत.व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भुईंज पोलीस स्टेशन हे सातारा-पुणे महामार्गावर येत असल्याने या ठिकाणी  अपघात व मोठे गुन्हे होत असतात. मात्र भुईंज पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याने घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.  वारंवार पोलीस स्टेशन कडून सर्व गावांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सांगितले असून सुद्धा त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने चोरीच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने गुन्हेगारांना ओळखणे, त्यांचा मागोवा घेणे, पुरावे गोळा करणे यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे आहेत. खून किंवा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगार कोणत्या दिशेने गेले आहेत,  त्यांनी कोणत्या वाहनांचा वापर केला हे समजण्यास मदत होते. मात्र,अनेक गावांमध्ये सीसीटी कॅमेरे नसल्याने पोलिसांना तपास कार्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या हाणामाऱ्या, लुटमार, आंदोलने किंवा इतर गुन्ह्यांची दृश्य पुरावे सीसीटीव्हीमुळे उपलब्ध होतात.मोठ्या गावांची लोकसंख्या असताना सुद्धा अनेक ग्रामपंचायतींनी सीसीटीव्ही बसवले नसल्याने पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक अपघातांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज महत्वाची भूमिका बजावते अपघाताची कारणे, दोषी वाहने किंवा नियम तोडणाऱ्याची  माहिती मिळवण्यासाठी कॅमेरे उपयुक्त ठरतात. मात्र, सध्या अनेक ग्रामपंचायतीकडून सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याने पोलिसांना तपास प्रक्रिया प्रभावीपणे करता येत नाही. त्यामुळे लोकसहभागातून किंवा ग्रामपंचायतीच्या निधीतून सर्व ग्रामपंचायतींनी  सीसीटीव्ही कॅमेरे बसवने गरजेचे आहे.

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!