मवीआ च्या जागा वाटपांचा तिढा सुटेना….काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रद्द
काँग्रेस पक्षाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रविवारी होणार होती परंतु जागा वाटपाच्या गुंत्यामुळे कालची बैठक रद्द झाली.ही बैठक आज काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत होणार आहे .राज्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते हे सध्या दिल्लीत आहेत .दिल्लीत काँग्रेस उमेदवारांची यादी निश्चित करण्यात येत आहे .रविवारी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली तर महाविकास आघाडीमध्ये जागावाटप मुद्द्यावरून वाद सुरूच आहेत. रविवारी भाजपा ने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली तर महाविकास आघाडीमध्ये जागावाटप मुद्द्यावरून वाद सुरूच आहेत. काँग्रेसचे शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत खटके उडाल्याची बातमी समोर आल्यानंतर काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांसोबत दिल्लीत बैठक घेतली. ही बैठक आज होण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेवर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व ते जागा वाटपात सहकार्यकरत नाहीत असा नेत्यांचा सूर होता. मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच्या बैठकीत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे गट काँग्रेसचे जागा का मागतात?राष्ट्रवादीची जागा का नाही ?असे प्रश्न उभे केले उलट आता शिवसेना ठाकरे गटाने ताठर भूमिका सोडावी अशी अपेक्षा काँग्रेस नेत्यांनी केली. लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे राज्यातील कार्यकर्ते सक्रिय झाले असून अनेक जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊ शकतात असेही राज्यातील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सांगितले.
