महत्त्वाच्या बातम्या

महाबळेश्वर मध्ये सापडले दुर्मिळ वटवाघूळ

      निसर्ग संपदेने संपन्न असा पश्चिम घाट हा जागतिक स्तरावरील जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. येथे विविध प्रजातींचे प्राणी, वनस्पती आढळतात.महाबळेश्वर येथे अशाच एका वटवाघळाची प्रजाती आढळून आली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर येथील सरफराज शेख यांच्या घरात हे वटवाघूळ आढळून आले. त्याला या वटवाघळास पेंटेड बॅट म्हणून ओळखले जाते. सरफराज शेख यांच्या घरात रंगीत वटवाघूळ दिसता त्यांनी ते बरणीच्या सहाय्याने पकडले व वन विभागाच्या कार्यालयात दिले.

      पश्चिम घाट परिसरातील महाबळेश्वर येथे वेगवेगळ्या प्राण्यांचा अधिवास आहे. वनस्पतींच्या विविध जाती येथे पाहायला मिळतात. महाबळेश्वरचा बरचसा भाग हा दऱ्या खोऱ्याने व्यापला आहे. येथे वटवाघळांच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतात.  पेंटेड बॅट नावाने ओळखले जाणाऱ्या या वटवाघळाचा वावर, गुहा, केळीची झाडे,सुकी वने , झोपड्यांची कोपरे येथे असतो. वटवाघळाचा रंग नारंगी, पंखावरती काळे पट्टे,वजन 50 ग्रॅम,38 दात व शरीराची लांबी 3 ते 5 मिटर आढळते.त्याचे अन्न छोटे किडे असून ही वटवाघळे पाच ते सहा च्या समूहाने राहतात.
       सरफराज शेख यांनी पकडलेल्या या वटवाघळास वनविभागाच्या सहाय्याने नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!