महत्त्वाच्या बातम्या

“माघार नाहीच!” सोनम वांगचुक यांचे उपोषण सुटले, पण शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दिपके ठाम

नवी दिल्ली: नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकारचे दोन मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या हस्तक्षेपानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल २६ दिवसांनंतर मेदांता रुग्णालयात उपोषण मागे घेतले असले, तरी हे आंदोलन अद्याप संपलेले नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याच्या मागणीवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) ठाम असून, जोपर्यंत राजीनामा मिळत नाही तोपर्यंत जंतर-मंतरवरील शांततापूर्ण निदर्शने सुरूच राहतील, असा थेट इशारा पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

सोनम वांगचुक यांनी दाखवलेले धैर्य आणि त्यागाबद्दल त्यांचे आभार मानतानाच अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले की, केवळ तोंडी किंवा लेखी आश्वासनांवर विद्यार्थ्यांचे समाधान होणार नाही. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींची जबाबदारी निश्चित करण्यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी पदावरून पायउतार होणे अत्यंत गरजेचे आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनीही या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून, २४ जुलै रोजी पुकारण्यात आलेले देशव्यापी आंदोलन पूर्व नियोजित वेळेनुसारच पार पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या आंदोलनाच्या वाढत्या प्रभावामुळे मोदी सरकार पूर्णपणे सतर्क झाले असून प्रशासनाकडून कडक पाळत ठेवली जात आहे. काही दिवसांपूर्वी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनाला काही असामाजिक तत्त्वांनी हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक होऊन दगडफेक व लाठीमार झाला होता. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीने सर्व विद्यार्थ्यांना व नागरिकांना २४ जुलैच्या देशव्यापी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतानाच, आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण मार्गाने पार पाडण्याची विनंती केली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!