महत्त्वाच्या बातम्या

माजी सैनिक कल्याण मंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांची अपशिंगे (मिलिटरी) गावाला भेट

       सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलिटरी) येथे  आज आयोजित आजी-माजी सैनिकांचा मेळावा माजी सैनिक कल्याण मंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या  उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यास आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी त्यांच्याशी संवाद साधला. 

       यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, अपशिंगे (मिलिटरी) गावाला सैनिकी परंपरा आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील एकतरी सदस्य सैन्यदलात कार्यरत असून देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहेत. आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या या अपशिंगे गावच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी व्यक्त केला. पहिल्या महायुद्धात या गावातील ४६ जवान शहिद झाले होते. या तसेच गावातील माजी सैनिकांच्या शौर्याची माहिती बाहेरील लोकांना व्हावी यासाठी वॉर मेमोरियल तयार करण्यात येईल, अशी ग्वाही मा. ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली.

      तसेच या गावातील रस्ते, शाळा व इतर अनुषंगिक बाबींसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच प्रशासनाची बैठक लावण्यात येईल, असेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.  यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, सैनिक कल्याण विभागाचे संचालक दीपक ठोंगे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे, गावचे सरपंच तुषार निकम, माजी कॅप्टन आर. डी. निकम, शंकर माळवदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!