मानखुर्द महाराष्ट्र नगर मधील पाण्याच्या समस्येसाठी शिवसेना शिंदे गट शाखाप्रमुख नवनाथ मतकर यांचा पुढाकार
शिवसेना उपनेते, लोकसभा गटनेते, दक्षिण मध्य मुंबई चे लोकप्रिय खासदार, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा संपर्कप्रमुख, मा.श्री.राहुल शेवाळे व जिल्हा नियोजन समिती सदस्य दक्षिण मध्य मुंबई लोकसभा महिला संपर्कप्रमुख, मा.नगरसेविका सौ.कामिनी राहुल शेवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीएमसी अधिकारी श्री संजय कोलपटे साहेब श्री सुभाष कांबळे साहेब यांना घेऊन महाराष्ट्र नगर मधील पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी जाऊन शिव प्रेरणा चाळ, विजय लक्ष्मी चाळ नवनाथ चाळ, रायरेश्वर चाळ, शिवशंकर चाळ या ठिकाणी बीएमसी अधिकार घेऊन जाऊन नागरिकांच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी पाहणी केली . लवकरात लवकर या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्याला शब्द दिला आहे. यावेळी शाखाप्रमुख नवनाथ मतकर व शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
